Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik News : मनसेच्या 'राजगड'वर झळकला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक

Nashik News : मनसेच्या ‘राजगड’वर झळकला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक

शहराध्यक्ष काय म्हणाले?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आज (रविवार) ६५ वा वाढदिवस (Birthday) आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्यांनतर त्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले आहेत.

नाशिकमधील मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयाबाहेर (MNS Rajgad Office) शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे फलक (plaque) लावण्यात आले आहे. या फलकावर सकाळी मुंबईत (Mumbai) झालेल्या राज-उद्धव भेटीचा (Raj-Uddhav Meet) फोटो झळकविण्यात आला आहे.

दरम्यान, या फलकामुळे नाशिकमधील (Nashik) राजकीय चर्चांनाही नवा रंग मिळाला आहे. तर कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा फलक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) युतीचे संकेत देणारा तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...