Thursday, May 7, 2026
HomeनाशिकNashik News : 'आम्ही तुम्हाला शोधणारच…'; पसार झालेल्या संशयितांना पोलिसांचे आव्हान

Nashik News : ‘आम्ही तुम्हाला शोधणारच…’; पसार झालेल्या संशयितांना पोलिसांचे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या आठवड्यांपासून शहरात सर्वत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व पथके रस्त्यावर उतरुन टवाळखोर व मद्यपींची धरपकड करीत आहे. असे असतानाच, शहर आयुक्तालयाने (City Office) या सराईतांसह टवाळखोरांना एक इशारा दिला आहे. कारवाई काही दिवसांनी थंडावेल या उद्देशाने काही संशयित विविध जिल्हे व परराज्यात पसार झाल्याने ही कारवाई थांबणार नाही. तुमच्या मागावर आहोत’, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, नव्याने बॅनर व फ्लेक्सबाजीसाठी नवीन नियमावली करण्याचा विचार शहर पोलीस करत आहेत.

- Advertisement -

शहरातील अतिक्रमण कारवाईत (Action) दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) रस्त्यावर उतरल्याचे नाशिककरांनी बघितले. ‘राजाश्रय’ असणाऱ्यांची आयुक्तांनी व्यक्तिशः कानउघाडणी केली असून उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे यांचीही पथके संशयितांची धरपकड करीत आहेत. यासह सहाय्यक आयुक्त संदीप कर्णिक, शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी, अद्विता शिंदे, संगीता निकम यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये सहभागी आहेत.

दिवाळीपूर्वी (Diwali) शहरातील या ‘स्वच्छतासत्रा’मुळे नाशिककरांनीही पोलिसांचे कौतुक केले आहे. या स्वरुपाच्या पोलिसिंगसह कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार आयुक्तालयानेही ‘ही कारवाई थांबणार नसून, अधिक कठोर होईल’, अशी भूमिका स्पष्ट केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे अनेकांची दिवाळी यंदा घराबाहेर, युनिट एकसह कारागृहात होण्याची चिन्हे आहेत. काही पसार संशयितांचे ‘लोकेशन’ मिळवून सापळे रचले जात आहेत.

दरम्यान, शहरात ‘भाई’, आप्पा, बाहुबली, ‘दादा’, ‘अण्णा’, ‘सरकार’, ‘बॉस’, ‘किंगमेकर’ या स्वरुपाचे ‘बॅनर्स’ लावून दहशत निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे पोलिसांनी नोंदवले आहेत. त्या धास्तीने काहीजण शहरातून पसार झाले असून, आगामी टप्प्यात महापालिकेसह पोलिसांचीही ‘बॅनर्स’ करीता पूर्वपरवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. ‘बॅनर्स’वरील फोटो व मजकूर तपासण्याकरीता स्वतंत्र ‘टेबल’ तयार करण्याचा निर्णय होणार आहे.

संशयित कोणत्याही पार्श्वभूमीचा, ‘लहान-मोठा’ असला तरीही कारवाई होईलच. ग्रामीण पोलिस, नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयासोबतही उत्तम समन्वय असून, नागरिकांनी निर्धास्त व निर्धोकपणे ‘भाईगिरी’ करणाऱ्यांची नावे कळवावीत. योग्य कारवाई करू.

संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

सुरु असलेल्या कारवाईतून

  • ‘बॅनर’द्वारे दहशत केल्याने २३ गुन्हे
  • स्टॉप अँड सर्च अंतर्गत ८,४६५ जणांवर कारवाई
  • ‘रिल्स’वरुन दहशत केल्याने १२ गुन्हे; ६५ संशयित
  • मद्यधुंदावस्था, गोंधळामुळे २१ गुन्हे, ५४ संशयित
  • दहा दिवसांत २,५७१ तर जानेवारीपासून आतापर्यंत ३० हजार टवाळखोरांवर कारवाई
  • अवैधरित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी ३४ संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

Crime News : टरबूज परत केल्याच्या रागातून सावेडीत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी घडली. विकत घेतलेले टरबूज...