Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकNashik News : ...अन् विखुरलेली भिंत झाली बोलकी; 'सीपी व्हाट्सॲप'वर ज्येष्ठ महिलेची...

Nashik News : …अन् विखुरलेली भिंत झाली बोलकी; ‘सीपी व्हाट्सॲप’वर ज्येष्ठ महिलेची तक्रार

पोलिसांच्या तत्परतेने भरपाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मद्यपि कारचालकांकडून संरक्षक भिंतीचे नुकसान आणि कारमधील तरूणांकडून दमदाटी याबाबत एक ज्येष्ठ महिलेने शहर पोलीस आयुक्तांच्या (CP Police Commissioner) ‘सीपी व्हाट्सॲप’ नंबरवर (CP WhatsApp Number) मेसेज करुन कैफियत मांडली. मेसेज मिळताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवत संशयितांचा शोधून महिलेला भरपाई मिळवून दिली. पासष्ठ वर्षीय महिला उपनगर पोलिसांच्या हद्दीतील नारायण बापू चौकात वास्तव्यास आहे. तिची मुलगी सायकोलॉजिस्ट असून मे महिन्यातील एका रात्री महिला घरात झोपलेली असताना भरधाव कारने जाणाऱ्या दोघा मद्यपींनी तिच्या घराच्या भिंतीस जोरदार धडक देऊन नुकसान केले.

- Advertisement -

जोरदार आवाज झाल्याने महिला बाहेर आली व तिने संशयितांना (Suspected) जाब विचारला. तेव्हा उलटपक्षी संशयितांनी तिला दमदाटी करुन शिवीगाळ केली व पळ काढला. यानंतर, महिलेने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सीपी व्हाटस् अॅप क्रमांक ९९२३३२३३११ वर निकडीचा मेसेज टाकून कैफियत मांडली. या मेसेजची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिले. त्यानुसार, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेने डीबीसह पथकाने संबंधित मद्यपि तरुण व कारचा तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फूटेजनुसार शोध घेऊन ताबा घेतला.

दरम्यान, यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात (Police Station) आणून आवश्यक कार्यवाही सुरु केली. तेव्हा संबंधित महिलेने घराच्या भिंतीचे नुकसान भरपाई स्वरुपात मिळण्याची विनंती केली. त्यानुसार, पोलिसांनी पाठपुरावा करुन संबंधित संशयित तरुणांककडून वीस हजार रुपयांची भरपाई महिलेस मिळवून दिली. त्यानंतर, नेस्तनाबूत झालेल्या भिंतीची पुढील ४८ तासांत पुनर्बाधणी करण्यात आली. त्यामुळे महिलेसह तिच्या मुलीने समाधान व्यक्त केले. यानंतर दोघींनी कर्णिक यांची भेट घेऊन आभार मानले.

तेव्हा रोडरोमियोला चोप

जिल्हा रुग्णालयाजवळील एका निर्माणाधीन इमारतीलगतच्या खासगी कार्यालयात कार्यरत तरुणीने ११ मे रोजी शहर पोलिसांना मदतीची हाक दिली. त्यानुसार सीसीटीव्ही किंवा इतर तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना तरूणीने घेतलेल्या व्हिडिओतील हावभाव व जेमतेम माहितीवरून गुन्हे शोध पथकाने संशयित सचिन जगताप या तरुणाला ताब्यात घेतले होते.

दोन हजारहून अधिक तक्रारी

आतापर्यंत या क्रमांकावर नाशिककरांनी ४ हजार ६०० हून तक्रारी केल्या आहेत. त्यात सर्वाधिक २ हजार ११९ तक्रारी अवैध धंद्यांविषयक असल्याचे समजते. तर, वाहतूकीसंदर्भात ७४१ हून अधिक, ध्वनी प्रदूषणाच्या २३०, रस्त्यावरील उपद्रवाबाबत १००, महिला सुरक्षाबाबत ७४, ज्येष्ठ नागरिकांशी संदर्भात ५८, पोलिस गस्तीबाबत २५, अंमली पदार्थाबाबत ११ व इतर स्वरुपाच्या २००० हून अधिक तक्रारी व्हॉट् सअपवर मिळाल्या आहेत. यातील ९३ टक्के तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित तक्रारींचे निराकरण सुरु आहे.

दृष्टीक्षेपातून

– व्हाट्सॲप हेल्पलाइन नंबर : ९९२३३२३३११

– नाशिकमध्ये ‘रोमिओगिरी’ खपविणार नाही; आयुक्तालयाचा इशारा

– महिला सुरक्षेला प्राधान्य, तक्रारीनुसार कारवाई क्रमप्राप्त

– तुम्ही अजूनही गप्प आहात ?, ‘बोला, आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत’ या स्वरुपात पोलिसांचे तक्रारींसाठी आवाहन

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...