Thursday, May 28, 2026
HomeनाशिकNashik News : प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची तब्येत...

Nashik News : प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची तब्येत खालावली

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

नाशिक (Nashik) भोवतालच्या प्रस्तावित ६६ किलोमीटरच्या बाह्य रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात (Protest) आता प्रशासकीय विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटला आहे.भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि मुंगसारा येथील महिलांना (Women) मारहाण करणाऱ्या प्रांतधिकारी पवन दत्ता यांच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२८) रामकुंडावरील उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक दशक्रिया विधी आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत हा कार्यक्रम उधळून लावला.

आगामी कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmla) पार्श्वभूमीवर हा रिंग रोड प्रस्तावित असला,तरी यामुळे २५ गावांतील शेतकऱ्यांची सुपीक व उपजाऊ जमीन नष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांनी २६ मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी नेते साहेबराव दातीर, ॲड. कैलास खांडबहाले आणि सचिन जाधव यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. कडक उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली असून साहेबराव दातीर यांचा रक्तदाब (बीपी) वाढला आहे, तर खांडबहाले व जाधव यांना डिहायड्रेशनचा (शरीरातील पाणी कमी होणे) तीव्र त्रास सुरू झाला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी करून त्यांना तातडीने सलाईन लावण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला उपोषणकर्त्यांनी नकार दिला, मात्र नंतर त्यांना जबरदस्तीने सलाईन लावण्यात आले.शासनाने बाह्य रिंग रोडचा अट्टाहास न धरता केवळ डीपी रोड करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची (Farmer) आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी उधळून लावला कार्यक्रम

उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी (Farmer) प्रतीकात्मक दशक्रिया विधी (Dashakriya Vidhi) आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी (Police) घटनास्थळी हस्तक्षेप करत हा कार्यक्रम उधळून लावला

यापूर्वीच्या आराखड्यात ग्रामीण भागातील टीपी रोड आणि शहरी भागातील डीपी रोड मंजूर असताना, आता नवा रिंग रोड बनविण्याचा अट्टाहास का? प्रशासनाने आज दखल घेतली नाही, तर उद्या सर्व बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालतील.

साहेबराव दातीर (शेतकरी नेते)

.

ताज्या बातम्या

SET Exam 2026 – सेट परीक्षेची तारीख जाहीर

0
पुणे | प्रतिनिधी Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा)...