Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : शेती वापराचा ९० मॅट्रिक टन युरिया खाजगी कंपनीच्या घशात;...

Nashik News : शेती वापराचा ९० मॅट्रिक टन युरिया खाजगी कंपनीच्या घशात; दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) रामशेज येथील एका खाजगी कंपनीने शेतीसाठी (Agriculture) वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या (Agriculture Department) मोहिमेत उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, रामशेज येथील गट नंबर ३०५/ १३ मध्ये असलेल्या पशुखाद्य बनविणाऱ्या एका खाजगी कंपनीची (Private Company) तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे आवर सचिव चेतराम मीना व जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक देशमुख यांनी केली असता तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तावेज, साठा नोंदवही, खरेदी किंमत, युरिया दैनंदिन वापर नोंदवही, कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला.

त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने ५० किलो बागेतील युरियाची किंमत २४ ते २८ रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने युरियाची तपासणी केली असता टेक्निकल ग्रेड औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आले. यानंतर ९० मॅट्रिक टन वजनाच्या ५० किलो वजनाच्या १८०० बॅगा किंमत २२ लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज सीलबंद करून दिंडोरी पोलिसात (Dindori Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...