Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : गुन्हे तपासाला 'आय-बाइक' चे बळ

Nashik News : गुन्हे तपासाला ‘आय-बाइक’ चे बळ

आठ आयुक्तालयांसह १५९ कर्मचाऱ्यांना ‘डीटीएस’ मध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण

नाशिक । भारत पगारे | Nashik

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आता पाेलीस दलात (Police Force) माेबाईल फाॅरेन्सिक व्हॅन दाखल झाली असतानाच त्यातील आणखी पुढचे पाऊल म्हणचे प्रशिक्षित पाेलीस अमलदारांना ‘इन्व्हेस्टिगेश बाईक’ (Investigation Bike) अर्थात ‘आय बाईक’ दिली जाणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (बीएनएसएस) गंभीर गुन्ह्यांत न्यायवैज्ञानिक सहाय्य (फॉरेन्सिक) तपास अनिवार्य केल्याने राज्यभरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना ‘फॉरेन्सिक व्हॅन व आय-बाइक’चे प्रशिक्षण दिले जात आहे.

- Advertisement -

नाशिकच्या (Nashik) गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात (डीटीएस- डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल) सुरू झालेल्या पाच दिवसीय पहिल्या सत्रात राज्यातील ७ आयुक्तालयांसह ३६ जिल्हे (District) अशा एकूण ४५ पोलीस घटकांतील १५९ अंमलदारांना प्रशिक्षित केले जात आहे. ‘बीएनएस’ ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून सात वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसह मध्यम ते गंभीर गुन्ह्यांत ‘फॉरेन्सिक’ (न्यायसहाय्यक वैज्ञानिक) पथकाचा पंचनामा अनिवार्य करण्यात आला आहे.

त्यानुसार अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून पाेलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यावरही भर दिला जात आहे. त्यानुसार, नुकत्याच राज्य पाेलीस दलाच्या (State Police Force) अनेक पाेलीस आयुक्त व अधिक्षक कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासह अद्ययावत वाहनांचा ताफा देण्यात आला आहे. त्यामुळे तंत्र व शास्त्रशुद्ध तपास अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून, ‘फॉरेन्सिक’च्या मदतीसह तपासात आता ‘आय बाईक’ धावताना दिसणार आहे.त्यासाठीचे नियोजन दृष्टिपथात येताना दिसते आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, पिंपरी चिंचवड, मिरा भाईंदर या आठ आयुक्तालयांसह ३७ जिल्ह्यांतील अंमलदारांसाठी ‘डीटीएस’मध्ये १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयाेजित करण्यात आले आहे. नाशिक (Nashik) येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व मुंबईच्या हेलिक ॲडव्हायझरी लिमिटेडमधील तज्ज्ञ आणि व्याख्याते पोलिसांना प्रशिक्षित करीत आहे. विद्यालयाचे प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशान्वये, उपप्राचार्य मनोज खंडाळे, पाेलीस निरीक्षक नरेंद्र पवार, सुनिल बच्छाव, राजेंद्र उशिरे यांसह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.

यासाठी आय बाईक व व्हॅन

‘बीएनएसएस’नुसार सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यात घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देत पंचनामा करणे अनिवार्य आहे. मात्र, त्यापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यातही तांत्रिक तपासाला महत्त्व आहे. यासह प्रत्येकवेळी ‘फॉरेन्सिक व्हॅन’ प्रत्येक ठिकाणी पोहोचेलच असे नाही. त्यामुळे ‘फॉरेन्सिक आय-बाइक’चा वापर राज्यात सुरू करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात केवळ ‘फॉरेन्सिक व्हॅन’ नव्हे, तर ‘फॉरेन्सिक आय-बाइक’द्वारे दुर्गम भागात व गर्दीच्या ठिकाणी तपासी अधिकारी व अंमलदारांना सर्व प्रकारचा तांत्रिक व शास्त्रोक्त तपास करणे शक्य होईल.

प्रशिक्षणात काय?

अपघाती घटना, लैंगिक अपराध, ड्रग्ज व सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हे ‘फॉरेन्सिक किट’च्या सहाय्याने ओळखणे, डिजिटल पुराव्यांचे संकलनाबाबतची कार्यपद्धती पोलिस अंमलदारांना शिकविण्यात येत आहे. यासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे कसे ओळखावे, फॉरेन्सिक मेडिसिन व अंगुलीमुद्रा शास्त्राबाबतही (फिंगरप्रिंट) पोलिसांना प्रशिक्षित केले जात आहे. दरम्यान, खून, बलात्कार, पोक्सो या गंभीर गुन्ह्यांसह ‘एनडीपीएस’ अंतर्गत ‘ड्रग्ज’सह मानवी मेंदूवर परिणाम करणारे रासायनिक पदार्थ (सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) ओळखणे या प्रशिक्षण वर्गानंतर अंमलदारांना शक्य होणार आहे.

‘फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक आय-बाइक’च्या प्रशिक्षण सत्राची सुरू आहे. पहिल्या प्रशिक्षण वर्गांत ४५ घटकातील दीडशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे तपासासाठी सबळ पुराव्यांच्या संकलनासह शास्त्र व तंत्रशुद्ध तपासाकरिता या आय बाईक व प्रशिक्षित अंमलदार भविष्यात न्याय व्यवस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

चंद्रकांत गवळी, प्राचार्य तथा पाेलीस अधिक्षक, डीटीएस, नाशिक.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...