Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

Nashik News : सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे प्रमुख मुंबईत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकला (Nashik) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात आज सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण (Presentation ) करण्यात येणार आहे. मागील दोन दिवस सर्व विभागांद्वारे नियोजनावर अंतिम हात फिरवला जात असून, त्याचे सादरीकरण राज्य शासनाकडे आज केले जाणार आहे. त्यासाठी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा परिषद, पोलीस व प्रशासनाच्या सर्वच विभागांचे प्रमुख आज मुंबईत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांद्वारे आराखडे तयार करण्यात आले असून, विभागीय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्याच्या मुख्य सचिवांसमोर सादरीकरण केले जाणार आहे. त्यावर चर्चा केली जाणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेने सात हजार कोटींचा विकास प्रारुप आराखडा तयार केला असून आयुक्त मनीषा खत्री त्यांचे मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिवांना सादरीकरण करणार आहे. त्यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही मनपा अधिकाऱ्यांनी आराखड्यावर अंतिम हात फिरवला. सिंहस्थात मुख्य फोकस असलेल्या रामकुंड व गोदाघाटाला आयुक्त खत्री यांनी दोनदा भेट सादरीकरणासाठी बारकावे जाणून घेतले.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. साधूमहंत (Sadhumant) व त्यांचे आखाडे तसेच देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहे. त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांकडून तयारीला वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) दर मंगळवारी सर्व विभागांचा कुंभमेळा आराखडा व नियोजन याचा बारकाईने आढावा घेत आहे. नाशिक महापालिकेने कुंभमेळा अनुषंगाने पायाभूत सुविधा व विविध विकासकामांचा प्रारुप आराखडा तयार केला होता. त्यात प्रामुख्याने साधुग्राम व पार्किंगसाठी जागा तिचे भूसंपादन यावरच साडेआठ हजार कोटींचा खर्च धरण्यात आला.अंतर्गत रिंगरोड, शहरसतील रस्ते व पूल, साधूग्राममध्ये पायाभूत सुविधा या बांधकाम विभागाशी निगडीत सहा ते सात हजार कोटींची कामे होती.

वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा संकलन, सफाई कर्मचारी आउट सोर्सिंग, ड्रेनेज, मलनिस्सारण, गोदा स्वच्छता व सुशोभिकरण आदी विभागाच्या कामांचा समावेश होता. हा आराखडा तब्बल पंधरा हजार कोटींवर गेला होता.मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासमोर हा आराखडा सादर केला. तेव्हा त्यांनी मनपा प्रशासनाचे कान टोचत अत्यावशक कामांचा समावेश करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही कुंभमेळ्याशी निगडीत कामांचा समावेश करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने (Municipal Administration) आराखड्यात काटछाट करत तब्बल आठ हजारांची आराखड्यात कपात केली. हा आराखडा आता मुख्य सचिवांना सादर केला जाणार असून त्याकडे लक्ष लागून आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...