नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील (District) बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८१० आणि अनुसूचित क्षेत्रातील ५७७ अशा एकूण १,३८७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यातच महिला सरपंचपदाचेही आरक्षण (Reservation) काढले जाणार आहे. प्रथम २१ एप्रिल रोजी एकत्रित आरक्षण काढल्यानंतर २३ आणि २४ ला तालुकानिहाय महिला आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
एकूण २०२ बिगर अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरीता सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या जागा सोडून जिल्ह्यातील इतर जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अशा सुमारे १,३८७ जागा असून त्यांची सोडत २१ एप्रिल रोजी काढण्यात येईल. त्यानंतर महिला आरक्षण सोडत २३ व २४ एप्रिलला काढली जाईल. त्यामध्ये ७०४ जागा महिला सरपंचपदासाठी (Sarpanch) राखीव आहे.
जिल्हयातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८१० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४१४ महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या ५७७ असून त्त्यापैकी २९० जागा महिलांसाठी राखीव आहेत. सोमवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रत्येक तालुक्यात आरक्षण (Taluka Reservation) सोडत सभा तहसील कार्यालयात होणार आहे.
दरम्यान, तहसीलदारांच्या उपस्थितीत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, येवला या तालुक्यात महिला आरक्षण सोडत २३ एप्रिलला १२ वाजता तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, निफाड, येवला येथे दि. २४ रोजी महिला आरक्षण सोडत होणार आहे.
बिगर अनुसूचित क्षेत्राबाहेरील जागा
अनुसूचित जाती – ५४
अनुसूचित जमाती – १०७
नागरिकांचा मागास प्रवर्ग – २१८
सर्वसाधारण प्रवर्ग – ४३१
एकूण जागा – ८१०
अनुसूचित जमाती आरक्षण एकूण जागा – ५७७
महिला आरक्षण – २९०