Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik NMC News : महासभेपूर्वी मनपा मुख्यालयात आंदोलन; 'होर्डिंग घोटाळ्या'विरोधात घोषणाबाजी

Nashik NMC News : महासभेपूर्वी मनपा मुख्यालयात आंदोलन; ‘होर्डिंग घोटाळ्या’विरोधात घोषणाबाजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेची महासभा सुरू होण्यापूर्वी मनपा मुख्यालयाच्या आवारात आंदोलकांनी (Protest) जोरदार निदर्शने केली. “होर्डिंग घोटाळा.. ठेकेदार तुपाशी, भूमिपुत्र न्यायाच्या प्रतीक्षेत?” असे फलक हातात धरून आंदोलकांनी प्रशासनाचा आणि संबंधित ठेकेदारांचा निषेध नोंदवला.

- Advertisement -

आंदोलकांनी आरोप केला आहे की, महापालिका हद्दीतील होर्डिंगच्या कारभारात मोठा घोटाळा (Scam) झाला असून त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. ठेकेदारांचे (Contractors) भले होत असून भूमिपुत्र मात्र न्यायापासून वंचित राहत आहेत.

महासभेच्या पार्श्वभूमीवर मनपा मुख्यालयात कडक पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...