Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपुणेगाव धरण @९५ टक्के; उनंदा नदीत होतोय विसर्ग

पुणेगाव धरण @९५ टक्के; उनंदा नदीत होतोय विसर्ग

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण ९५% भरले असून धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यांमुळे ओझरखेंड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. ओझरखेड धरण ६०.८५% इतके भरले आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळल्यामुळे करंजवण धरणामध्ये एकच दिवशी ७% पाणी वाढल्याने करंजवण धरणाचा पाणीसाठा ७५.०२ इतका पाणीसाठा झाला आहे.

तर पालखेड धरण ८८% भरले असून या धरणाचे पाणी कॅनाल द्वारे सोडण्यात आले आहे. वाघाड धरणाचा पाणीसाठा ८०.५२ इतका झाला असून सर्वात कमी म्हणजे २७.६०% पाणीसाठा तीसगाव धरणाचा आहे. दिंडोरी तालुक्यात तीसगाव धरण वगळता सर्व धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील सात विभागापैकी आतापर्यत सर्वात जास्त पाऊस ननाशी विभाग (१२७८.०) पडला असून वरखेडा विभागात (१०१०.१) कोशिंबे विभागात (८०४.१) उमराळे विभाग(७१५.०) वणी विभाग(५८६.०) दिंडोरी विभाग(५०७.०) तर सर्वात कमी पाऊस मोहाडी विभाग(३९५.०) इतका पाऊस झाला आहे.

त्यामुळे तालुक्यात पाऊसाची स्थिती समाधानकारक आहे, तसेच हवामान तज्ञांकडून अजून पाऊस पडणार असल्यांचे भाकित वर्तविले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या