Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : ३३ हजार शेतकऱ्यांचा रब्बी पीक विमा

Nashik News : ३३ हजार शेतकऱ्यांचा रब्बी पीक विमा

येवला तालुक्यात सर्वाधिक नोंद, त्याखालोखाल सिन्नर, मालेगाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यंदा नाशिक जिल्हयात (Nashik District) समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच छोटी व मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांची रब्बीची पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. कांदे, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड सुरु आहे. शासनाकडून (Governtment) रब्बी पीक विमा काढला जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार ६६२ शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेतल्याची माहिती जिल्ह्याच्या कृषी खात्याने (Department of Agriculture) दिली आहे. येवला तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ९२३ शेतकऱ्यांनी पिक विमा नोंदवला असून त्याखालोखाल सिन्नर, मालेगाव हे तालुके आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उत्तरवता येऊ शकतो. रब्बी ज्वारी पिकासाठी उद्यापर्यंत शनिवारी (दि.३०) मुदत आहे. तर गहू, हरभरा, कांदा व अन्य पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यतची मुदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे. पंतप्रधान पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

YouTube video player

पीक पेरणीतून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूरक्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात मागील तीन- चार वर्षात निसर्गाच्या लहरीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपिकाचा विमा उत्तरवणे त्यांच्या फायद्याचेच ठरणारे असते. या योजनेतंर्गत पिक विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता, विमा लागू असलेले तालुके, पीक विमा भरण्याची अंतिम मदत जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा. अवघ्या एक रुपयात हा विमा असून शेतकयांसाठी अत्यंत महत्वाचा असल्याने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवून घ्यावा.

कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी मतदारांचे योगदान महत्त्वाचे – जीवने

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे...