त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
गेली पंधरा वर्ष बंद असलेली रंगांची गाडी मिरवण्याची रंगपंचमीची (Rangpanchami ) परंपरा यावर्षी पुन्हा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर आज रंगपंचमीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आज कडक ऊन असून देखील बाल गोपाळ यांनी सकाळी रंग खेळायला सुरुवात केली. गेल्या पाच दिवस होळी धुळवड शिमगा सणाची सांगता रंगपंचमीने आनंदाने झाली. येथील कशावर्त तीर्थ चौक, लक्ष्मीनारायण चौक, पाटील गल्ली, चौकी माथा परिसर येथील मित्र मंडळ यांनी चौकात एकत्र येत वाद्य वाजवत नाचत गाजत रंग खेळला.
पूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) रंगाच्या गाड्या निघायच्या आणि घरोघरी जाऊन एकमेकाला रंगात भिजवत रंग फेकत असत. ही परंपरा गेली काही वर्ष बंद झाली होती. परंतु, यावर्षी ही परंपरा पुन्हा सुरू झाली. यावेळी मोती तलाव व्यायाम शाळा यांच्याकडून बैलगाडीतून वाद्य नाचत मिरवत गावभर रंग फेकण्यात आला. तसेच राजा छत्रपती व्यायाम शाळा यांनी देखील रंगाची गाडी काढली.
तर दुसऱ्या गाडीत मल्लखांब खेळणारे व्यायाम पट्टू होते. मल्लखांबाची चित्त थरारक प्रात्यक्षिके या मिरवणुकीत दाखवली जात होती. युवक पैलवान सामील होते.स्थानिक महिला युवती यांनी देखील रंगपंचमीचा आनंद परस्परांना रंग लावत साजरा केला. होळीच्या काळात गल्ली गल्ली चौका चौकात मित्रमंडळी महिला भगिनी यांनी एकत्र येत होळीची पार्टी केली. त्यामुळे शिमग्याची रंगत वाढली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नगरीत पोलीस (Police) बंदोबस्त होता.