Friday, May 3, 2024
Homeनाशिकरेणुका मिल्क फसवणुक प्रकरणी 'त्या' भागिदारांना होणार अटक

रेणुका मिल्क फसवणुक प्रकरणी ‘त्या’ भागिदारांना होणार अटक

नाशिक । प्रतिनिधी

निफाड येथील रेणुका मिल्क संस्थेच्या भागीदारीतील व्यवसायात भागिदाराला कोट्यावधींचा गंडा घालणार्‍या दोघा संचालकांचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे संशयीतांचा अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे…

- Advertisement -

परशराम निवृत्ती पवार (40 रा.रामपूर आंबेवाडी – नैताळे ता.निफाड) व विलास गंगाधर गुंजाळ (40 रा.जळगाव – काथरगाव ता.निफाड) अशी फसवणुक करणाार्‍या संशयीतांची नावे आहेत.

याप्रकरणी संदिप दत्तात्रेय आहेर (रा.पाथर्डी फाटा) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, दूध संघाच्या माध्यमातून सन.2011 मध्ये आहेर यांची विलास गुंजाळ यांच्याशी मैत्री झाली होती.

यावेळी जोडधंद्याच्या संकल्पनेतून रेणूका मिल्क प्लॉन्टची स्थापना करण्यात आली. 2012 मध्ये भागीदारी पत्रात बदल करण्यात आले.या भागीदारीत 40 टक्के आहेर यांना तर प्रत्येकी दोघांना 30 टक्के हिस्सा देण्याचे ठरले.

त्याबरोबरच खेळत्या भांडवलासाठी सदर प्लान्टवर दीड कोटींचे कर्ज काढण्यात आले. दोघा संशयीतांकडे हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी अल्पावधीतच तोटा झाल्याचे भासवून गैरव्यवहार केला.

ही बाब लक्षात आल्याने आहेर यांनी दप्तर तपासणी केली असता संशयीतांनी 1 कोटी 65 लाख 5 हजार 187 रूपयांचा गैरव्यवहार करून जमिनी घेतल्याचे पुढे आले. संबधीतांनी मोठ्या रकमांची सहा महिन्यात परतफेड करणे शक्य नसल्याचे सांगून हा प्लॉन्ट आम्हाला विकत द्या त्याच्यावर कर्ज काढून तुमच्यासह हात ऊसनवार घेतलेले पैसे परत करण्याची ग्वाही दिली.

त्यानुसार 3 जून 2016 रोजी नव्याने भागीदार संस्थेत आपले नातेवाईक नवीन सदस्य म्हणून घेतले. या काळात संस्थेच्या गैरव्यवहारास आहेर जबाबदार असल्याचे भासवून संशयीतांनी नातेवाईकांना कायदेशीर नोटीसा पाठविण्यास भाग पाडले.

यानंतर मात्र संशयीतांनी गुंतवणुकीची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ केली असून संशयीतांकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे.

याबाबत आहेर यांनी न्यायालयात दाद मागितल्याने हा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, यानंतर संशयीतांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला मात्र न्यायालयाने दोघा संचालकांचा अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या