Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : दिंडोरी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

दिंडोरी | Dindori | प्रतिनिधी

राज्य सरकारच्या (State Government) आदेशानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी नविन आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) दिंडोरी – पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसीलदार श्रीमती दराडे यांच्या उपस्थितीत दिंडोरी तालुका ग्रामपंचायत 2025 – 2030 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

या सरपंच आरक्षण (Reservation) सोडतीत दिंडोरी तालुक्यातील बिगर अनुसुचित क्षेत्रातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. लोखंडेवाडी (ना. मा. प्रवर्ग), वलखेड (सर्वसाधारण), मातेरेवाडी (ना. मा. प्रवर्ग), पाडे (सर्वसाधारण), जऊळके वणी (अनुसूचित जाती), आंबेवणी (सर्वसाधारण), शिंदवड (सर्वसाधारण), परमोेरी (सर्वसाधारण), तळेगाव वणी (सर्वसाधारण), सोनजांब (सर्वसाधारण), म्हेळूस्के (सर्वसाधारण), बोपेगाव (ना. मा. प्रवर्ग), अवनखेड (सर्वसाधारण), ओझरखेड (ना.मा.प्रवर्ग स्त्री), खेडगाव (अनुसूचित जमाती), लखमापूर (अनूसुचित जमाती) या प्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित झाले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...