Saturday, May 3, 2025
HomeनाशिकNashik News : किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये 'रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर' सुरु

Nashik News : किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर’ सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात नव्याने रुग्ण सेवेत दाखल होत असलेल्या किम्स मानवता हॉस्पिटल (KIMS Manavata Hospital) येथे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे (Robotic Joint Replacement Center) उदघाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते येथे करण्यात आले. नाशिक जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी या सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना केले.

- Advertisement -

सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्‍याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंटच्या आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया नवोपक्रमाचा एक नवीन टप्पा सुरू केला आहे आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास , रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे.

गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला ( CUVIS) हा स्वायत्त रोबोट आहे .किम्स मानवता हॉस्पिटल हे रुग्णांसाठी (Patient) सर्वोत्तम शस्त्रक्रिया परिणाम देण्यासाठी या रूपाने सज्ज झाले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होणार आहे. अशी माहिती किम्स मानवता हॉस्पिटलचे चेअरमन डॉ राज नगरकर यांनी दिली.

रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो इन-क्लिनिक निदान,सीटी-स्कॅन शस्त्रक्रियापूर्व नियोजन (व्हर्च्युअल सिम्युलेशन),स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया,हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज,पारंपारिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे असल्याचे आणि अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया विषयी सविस्तर माहिती सांधे विकार व सांधे बदल शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ स्पंदन कोशिरे यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे, उदघाटन प्रसंगी ऑर्थोपेडिक विभागाचे सांधे विकार व सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मयूर पेखळे , डॉ. प्रणित सोनवणे,डॉ स्पंदन कोशिरे उपस्थित होते. आभार प्रदर्शन सीओओ डॉ निलेश सिंग यांनी केले या प्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सोनु

Sonu Nigam: गायक सोनु निगमला पहलगाम हल्ल्याविषयी वक्तव्य करणं भोवलं; FIR...

0
मुंबई | Mumbai बॉलिवूडसह देशातील अनेक भाषांमध्ये गाणारा आणि गोड गळ्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गायक सोनु निगमने अनेक भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे....