नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (Shravan Monday) (दि. ११) त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) लाखो भाविक रवाना होणार असल्याने त्यांची वाहतूक सीबीएस (CBS) येथील जुन्या स्थानकावरून केली जाणार आहे. त्यामुळे दीड दिवस ‘सीबीएस ते टिळकवाडी’ हा रस्ता पूर्णतः बंद ठेवला जाणार आहे. या रस्त्यावरून केवळ बस सेवेला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. तर त्र्यंबकेश्वरमधील मार्गांतही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शहर व ग्रामीण पोलीस दलाने फेरी मार्ग, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील (Nashik-Trafic Route) वाहतूक आणि तिसऱ्या फेरीनिमित्तच्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सर्व महादेव मंदिरांबाहेर स्थानिक पोलिसांचा (Police) फौजफाटा तैनात असेल. यासह त्र्यंबकेश्वरमध्ये जाण्यासाठी रविवारी (दि. १०) दुपारपासूनच भाविकांची गर्दी होईल. यामुळे रविवारी दुपारी दोन वाजेपासून सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत सीबीएस सिग्नलसहित टिळकवाडीपर्यंतचे सर्व रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
या ठिकाणाहून कोणत्याही वाहनाला (Vehicle) वाहतुकीची परवानगी नसेल, असे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत. आगामी सिंहस्थाकरताशहर व ग्रामीण पोलिसांनी चोख नियोजन केल्याचा दावा सातत्याने करण्यात येत आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारीनिमित्त (दि. ४) त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची (Devotees) गर्दी झाली.
त्यातच ‘व्हीआयपीं’चा मंदिराशेजारील रस्त्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी भाविकांची चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली. त्यासंदर्भातील व्हीडिओदेखील व्हायरल झाले. तर दर्शनासाठी भाविकांची रांग खंबाळ्यापर्यंत पोहोचली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवले. आता तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सिंहस्थाच्या नियोजनाची तालीम घेण्याची संधी प्रशासनाला आहे.
शहरातील बदल
- सीबीएस सिग्नलकडून शरणपूररोडने टिळकवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर महामंडळ व सिटी बसेसला परवानगी
- सीबीएस सिग्नलकडून टिळकवाडीकडे जाणाऱ्यांनी सीबीएस-मेहेर-अशोकस्तंभमार्गे गंगापूररोडने रवाना व्हावे
- शरणपूररोडकडून येणारी वाहतूक पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोड, अशोकस्तंभमार्गे पुढे जाईल
- हे नियम पोलीस, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू नसतील
त्र्यंबकेश्वरसाठी निर्देश
रविवारी दुपारी बारा ते सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत त्र्यंबकमार्गे : नाशिक ते जव्हार आणि जव्हार ते नाशिक येथे जाणाऱ्या, येणाऱ्या सर्वच खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेशबंदी असेल. फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस त्र्यंबकेश्वरात येतील. तर सातपूर (हॉटेल अमृत गार्डन, बारदान फाटा पॉईन्ट), गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव वाघेरा फाटा-अंबोली फाटा-जव्हार आणि आंबोली टी-पॉईंट, वाघेरा फाटा गिरणारेमार्गे नाशिक असा तात्पुरता पर्यायी मार्ग असेल.




