नाशिक | Nashik
जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) २००८ साली बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटात (Bomb Blast) आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्या उपस्थितीत मालेगावात विराट हिंदू संत संमेलन (Hindu Sant Sammelan) पार पडणार होते. त्यासाठी त्या मालेगाव दौऱ्यावर येणार होत्या. परंतु, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा हा मालेगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा मालेगाव दौरा (Malegaon Visit) रद्द झाल्याचे समजते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना या संमेलनात हिंदूवीर पुरस्कार (Hinduveer Award) दिला जाणार होता. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी (Accused) असल्याने व रमजानचा महिना सुरू असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्यास मुस्लीम संघटनांनी विरोध केला होता.
दरम्यान, पोलिसांनी (Police) देखील या दौऱ्यास परवानगी नाकारली होती. पंरतु, आयोजकांनी त्यास मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले होते. यानंतर न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या दौऱ्यास काही अटी शर्तींवर कार्यक्रमाला परवानगी दिली होती. यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम संपवण्याचे म्हटले होते. याशिवाय साध्वींना प्रक्षोभक भाषण न करण्याची अटसुद्धा न्यायालयाने घातली होती. या अटींच्या अधीन राहून कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती.