Wednesday, April 2, 2025
HomeनाशिकNashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

Nashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

अधिकारी-पदाधिकार्‍यांची आढावा बैठक

सप्तशृंगगड | नांदुरी | वार्ताहर | Nanduri

आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाबाबत आज (बुधवारी) अधिकारी, ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर झाली.

- Advertisement -

श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव दि.०५ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत उत्सव होणार आहे. त्यादृष्टीने चैत्रोत्सवाच्या (Chaitrotsav) नियोजन व कायदा व सुव्यवस्था राखणे, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्यप्रकारे नियंत्रण, आवश्यक ते मदतकार्य प्रक्रियेसंबंधित निर्धारित पूर्तता होण्यासाठी बैठक झाली. प्रशासनाचे विविध विभागप्रमुख, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी, ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते. २१ मार्चला झालेल्या आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले की नाही, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

बैठकीचे (Meeting) स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले. ट्रस्टने भक्तांच्या सुरक्षितेसाठी अपघाती विमा उतरविला आहे. चैत्रोत्सवादरम्यान भाविकांची वाढती गर्दी आणि पिण्याच्या पाण्याच्या आवश्यकतेचा विचार करता पहिली पायरी (गणेश मंदिर), श्रीराम टप्पा (श्रीराम मंदिर), उतरती पायरी धर्मदाय दवाखाना, शिवालय तीर्थ आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे. भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह उभारणी, श्री भगवती मंदिर, प्रवेशद्वार व नांदुरी ते सप्तशृंग गड आदी ठिकाणी लायटींग बसविणे, यात्रा कालावधीत मोफत महाप्रसाद, अग्निशमन बंब व्यवस्था, आपत्ती व्यवस्था, साफसफाई व्यवस्था, फ्यनिक्युलर रोप वे प्रकल्पसंदर्भीय गर्दी व सुलभ दर्शन, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.

या कालावधीत खासगी वाहनांना (Private Vehicles) बंदी असून, दूध वाहतुकीता प्रशासनाने पासची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश तहसिलदार रोहिदास वारुळे यांनी दिले. यावेळी कळवणचे गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सहाय्यक निरीक्षक पाटोळे, आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले, वनविभाग अधिकारी दिपाली गायकवाड, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके आदी उपस्थित होते.

खासगी वाहनांना प्रवेश नाही

दरम्यान पाच एप्रिलपासून सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरु होत आहे. लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दि. ४ ते १२ एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक सुरू राहील. पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

चैत्रोत्सवातील नियोजन

  • चैत्रोत्सवात रोज ७० ते ८० हजार भाविक हजेरी लावण्याची शक्यता
  • दुभाजकांवर दुकाने थाटण्यास मनाई
  • श्री भगवती मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले
  • नांदुरी येथे गड पायथ्याशी बसस्थानक व वाहनतळ
  • मंदिरात जाण्याचा व मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग असे दोन स्वतंत्र मार्ग
  • ४ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व विविध ठिकाणी एकूण ,१२ हॅन्ड मेटल, डिटेक्टरद्वारे भाविकांची तपासणी
  • पहिली पायरी येथे नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र ०५ मशिनची व्यवस्था
  • पहिल्या पायरीजवळ कर्पूर कुंड व अगरबत्ती, तेल अर्पण व्यवस्था
  • श्री भगवती मंदिर, मुख्य प्रवेशद्वार चढत्या व उतरत्या पायऱ्यांच्या ठिकाणी नियंत्रण व उद्धबोधन कक्ष
  • भाविकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर कार्यान्वित होणार आहे.
  • विश्वस्त संस्था व शासकीय आरोग्य व्यवस्थेची प्राथमिक उपचार केंद्र २४ तास कार्यान्वीत
  • भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी १५ बार्‍याचे नियोजन करून बार्‍या धरण्यासाठी २० हंगामी कर्मचारी नियुक्ती
  • अखंडित वीजपुरवठवाहासाठी २ जनरेटर
  • सभा मंडपात दिवस आणि रात्री २० सुरक्षारक्षकांची नियुक्ती
  • श्री भगवती मंदिरापासून परशुराम बालाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्ग बंद
  • गडाच्या पायथ्याशी १६ एकरचा वाहनतळ
  • नांदुरी ते सप्तशृंगी गड १३० बसेसची व्यवस्था
  • नाशिक व अन्य विभागातून ३५० जादा बसचे नियोजन
  • सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, २० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २९५ कर्मचारी आणि २५० हेड कॉन्स्टेबल तैनात राहणार आहेत.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी प्रशासनाने आता विषयनिहाय सखोल चर्चा करण्यावर भर दिला असून, सिंहस्थात आवश्यक असणारा पाणीप्रश्न आणि...