Saturday, May 2, 2026
HomeनाशिकSayaji Shinde : तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये - सयाजी शिंदेंचा...

Sayaji Shinde : तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये – सयाजी शिंदेंचा इशारा, नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

पंचवटी | Panchvati | प्रतिनिधी

जगात खरा सेलिब्रेटी कोणी असेल तर तो झाड आहे. त्यामुळे तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी झाडांच्या संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला.नाशिकमध्ये झाडतोडीच्या संभाव्य कारवाईविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनादरम्यान त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

राज्य सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं, तर शासन आपलं की कुणाचं? झाडे वाचली पाहिजेत. त्यांना हात लावू देणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने झाडांच्या कत्तलीविरोधात एकजुटीने उभे राहावे.”भारताच्या राष्ट्रीय वृक्ष असलेल्या वडाच्या मोठ्या प्रमाणात तोड होण्याचा संदर्भ देत त्यांनी वननाशाला राष्ट्राचा मोठा अपमान ठरवले. “झाड म्हणजे जीवन देणारा देव. सावली, अन्न, पाणी देणारा हा खरा संत. साधी माणसं म्हणजेच आजचे साधूसंत. साधूसंतांच्या नावाखाली झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेने साधुग्राम परिसरात (Sadhugram Area) २२० कोटी रुपयांचे एक्झिबिशन सेंटर  प्रदर्शन केंद्र प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती वृक्षप्रेमींनी दिली असून,याविरोधात प्रबळ आक्रोश नोंदविण्यात आला.या पार्श्वभूमीवर टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. रात्री-बेरात्री आवाज द्या, मी धावून येईन, असे आवाहन करत शिंदेंनी येथील सर्व झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाची भावना व्यक्त करत त्यांनी झाडतोड म्हणजे त्यांचा अपमान असल्याचेही स्पष्ट केले.या आंदोलनाला नाशिकमधील नागरिक व वृक्षप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...