Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकNashik News : उद्धव ठाकरे 'या' तारखेला नाशिक दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Nashik News : उद्धव ठाकरे ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे येत्या १६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये (Nashik) एकदिवसीय शिबिरासाठी येत आहेत. या शिबिरात (Camp) ते शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. अशी माहिती उपनेनेते सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे आदींनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या (District) पदाधिकाऱ्यांकडून विभागीय बैठका घेण्यात येणार आहेत, असेही नेत्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) विजय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी, तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खा. संजय राऊत आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी या शिबिरात शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिकांना एकदिवसीय संवाद शिबिरातून मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, हे संवाद शिबिर मनोहर गार्डन या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणारे हे शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून शहरात (City) विभागनिहाय तर जिल्हाभर बैठका घेण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरात विभागनिहाय बैठका होणार आहेत. तर ६ ते ९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात शिबिरांच्या अनुषंगाने विविध समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...