Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकराज्य व केंद्रातील सध्याचे राज्यकर्ते पक्ष व स्वार्थ बघून काम करतात

राज्य व केंद्रातील सध्याचे राज्यकर्ते पक्ष व स्वार्थ बघून काम करतात

नाशिक रोड | प्रतिनिधी

राज्य व केंद्रातील सध्याचे राज्यकर्ते हे पक्ष व स्वार्थ बघून काम करत असतात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सर्व जाती धर्माचे पोषणकर्ते या भावनेने काम केले असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

- Advertisement -

जेलरोड परिसरात असलेल्या राजराजेश्वरी मंगल कार्यालयात अत्तार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी खासदार विनायक राऊत बोलत होते. आपल्या भाषणात खासदार विनायक राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात कुठेही दंगल झाली नाही काश्मीरचे ३७० कलम हटविल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शांत होता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मणिपूर जाळून आदिवासींना बेघर केले पंतप्रधान अजूनही मणिपूरला गेले नाही असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते बबनराव घोलप अत्तार समाजाचे नूर मोहम्मद यासीन अत्तार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश घोलप शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर देवानंद बिरारी सय्यद अजीम भाई शेख योगेश गाडेकर नितीन चिडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.यासोबतच मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या