Wednesday, June 10, 2026
HomeराजकीयNashik News : "...तर राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासणार"; ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार...

Nashik News : “…तर राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासणार”; ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. याप्रकरणी त्यांना नाशिक कोर्टात (Nashik Court) हजर राहावे लागणार आहे. मात्र, त्याआधी ठाकरेंच्या शिलेदाराने राहुल गांधी यांना माध्यमांशी बोलतांना चांगलाच कडक इशारा दिला आहे.

- Advertisement -

दराडे म्हणाले की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान केला, त्यांना माफीवीर म्हणून संबोधले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावले होते. पण आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू”, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

पुढे बोलतांना दराडे म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) गेली खड्ड्यात, सावरकर आणि हिंदुत्व आधी आहे”, असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत असून, या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : मुक्काम कारागृहातच! कडलगांना सातव्या सुनावणीनंतरही दिलासा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम...