Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : भाजपच्या 'त्या' माजी नगरसेवकाला तात्काळ अटक करा; ठाकरेंच्या शिवसेनेचे...

Nashik News : भाजपच्या ‘त्या’ माजी नगरसेवकाला तात्काळ अटक करा; ठाकरेंच्या शिवसेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

नेमकं प्रकरण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नांदूर नाका परिसरात (Nandur Naka Area) दोन युवकांवर (Youth) झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला नवीन वळण मिळाले आहे. या हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे (Uddhav Nimse) प्रत्यक्ष सहभागी असल्याचे दिसून आले असून, जखमींनी दिलेल्या फिर्यादीमध्येही त्यांचे नाव स्पष्ट नमूद आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई न झाल्याने शिवसेना उबाठा कडून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) महानगरप्रमुख प्रथमेश गिते, राहुल दराडे, दिलीप मोरे, वैभव ठाकरे, मसूद जिलानी, बाळासाहेब कोकणे, संजय गोसावी, आकाश धोत्रे तसेच जखमी युवकांचे धोत्रे व कुसाळकर परिवारातील सदस्य यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

दरम्यान, नागरिकांच्या (Citizen) सुरक्षेसाठी आडगाव व परिसरात (Aadgaon Area) आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनातील मुख्य मुद्दे

२२ ऑगस्ट रोजी आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन युवकांवर जीवघेणा हल्ला झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी गुंड व काही युवकांना बरोबर घेऊन स्वतः हल्ला केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तरीदेखील अद्याप कारवाई न होणे म्हणजे प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसते, असे निवेदनात नमूद केले आहे.

पीडित कुटुंबावर दबाव

जखमी युवकांच्या कुटुंबावर सध्या राजकीय दबाव व गुंडांचा दबाव टाकण्यात येत असून, त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीने थेट हल्ल्यात सहभागी होणे ही लोकशाहीवर आघात करणारी गंभीर बाब असल्याचेही ठाकरे गटाने स्पष्ट केले.

आंदोलनाचा इशारा

उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. हल्ल्यात सहभागी सर्व साथीदारांवरही गुन्हे दाखल करून कारवाई केली जावी. फिर्यादीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. चौकशी निष्पक्षपणे झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनातील गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे गृह विभागाला...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने...