Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात जिम बंदच; माॅल उघडण्यास सशर्त परवानगी

नाशिक जिल्ह्यात जिम बंदच; माॅल उघडण्यास सशर्त परवानगी

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकारने जरी जीम उघडण्यात परवानगी दिली असली तरी राज्य शासनसने करोना संसर्गाचा धोका पाहता महाराष्ट्रात जीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

तसेच माॅल सुरु करण्यास व आऊट डोअर अॅक्टिव्हिटीसाठी अटीशर्तीसह परवानगी दिली जाणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात हे नियम लागू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

सद्यस्थितीत ज्या पद्धतीने सर्व कामकाज सुरू आहे त्याच पद्धतीने पुढे देखील सुरू राहील. फक्त त्यामध्ये मॉल व आउटडोर ऍक्टिव्हिटीना परवानगी देण्यात आली आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाजाची वेळ सकाळी 9 ते 7 या दरम्यान राहील.

दुकानांच्या कामकाज विषयक पूर्वीच्या अधिसुचनेतील निर्देश शासनाने कायम ठेवले असल्यामुळे P1-P2 ही पद्धत देखील कायम राहील.

तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय देखील शासनाने कायम ठेवलेले असल्याने सायंकाळी 7 नंतर नाशिक शहरात लागू करण्यात आलेले संचारावरील निर्बंध देखील तसेच कायम राहतील.

करोना विषयक काळजी घेणे व दुसरीकडे अर्थचक्र सुरू ठेवणे याचा सुवर्णमध्य साधण्याचा शासनाने केला आहे.

जिल्ह्यात परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतु अद्यापही धोका पूर्ण टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे. पालकमंत्री, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच विविध लोकप्रतिनिधींशी वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार नाशिक शहर, मालेगाव शहर व उर्वरित जिल्ह्यात राज्य शासनाने दिलेल्या तरतुदीसह वरील आदेश जसेच्या तसे एक ऑगस्ट पासून लागू करण्यात येत आहेत.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या