Monday, May 4, 2026
HomeनाशिकNashik News : 'स्वयंपाकाचा गॅस' काळ्या बाजाराच्या हवेवर! नाशिकमध्ये उज्ज्वला टाकीसाठी वणवण

Nashik News : ‘स्वयंपाकाचा गॅस’ काळ्या बाजाराच्या हवेवर! नाशिकमध्ये उज्ज्वला टाकीसाठी वणवण

ग्राहकांच्या नशिबी रिकामी टाकी आणि 'नॉट रिचेबल'वितरक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या (Nashik) घराघरांत सध्या गॅस सिलिंडरवरून रणकंदन सुरू आहे. प्रशासनाकडे साठा मुबलक असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ग्राहकांच्या नशिबी मात्र रिकामी टाकी आणि ‘नॉट रीचेबल’ वितरक आले आहेत. घरगुती सिलिंडरचा (Gas Cylinders) हा तुटवडा नैसर्गिक नसून, तो वितरक आणि डिलिव्हरी बॉईजच्या संगनमताने तयार केलेला ‘कृत्रिम’ पेच असल्याचे गंभीर आरोप आता होऊ लागले आहेत.

- Advertisement -

नाशिकमधील अनेक गॅस एजन्सींचे अधिकृत बुकिंग क्रमांक सध्या बंद आहेत किंवा कोणीही दाद देत नाही. मात्र, दुसरीकडे १४ किलोचे घरगुती सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी आणि गरजू ग्राहकांना चक्क १४०० ते २१०० रुपयांना ‘ब्लॅक’ने विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यांना अधिकृत दराने गॅस हवा आहे, त्यांना ‘स्टॉक नाही’ असे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत, तर जादा पैसे (Money) मोजणाऱ्यांना घराजवळ चोरुन सेवा मिळत आहे.

दरम्यान, अनेकांच्या घरात रिकामे सिलिंडर पडून आहेत. ही स्थिती पाहून नाशिककरांना कोरोनाकाळातील (Corona) भीषण ‘शटडाऊन’ची आठवण होऊ लागली आहे. तेव्हा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरसाठी वणवण करावी लागत होती, आता पोट भरण्यासाठी स्वयंपाकाच्या सिलिंडरसाठी गल्लीगल्लीत भटकावे लागत आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी या साखळीवर चाप लावणे गरजेचे आहे.

‘आत्मनिर्भर’ नाशिककर

केंद्र सरकारच्या (Central Government) ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘उज्चला’ योजनेचा नाशिकमध्ये असा काही ‘रिफिल’ झाला आहे की, नागरिक आता खरोखरच आत्मनिर्भर झाले आहेत. गॅस एजन्सीवर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतः लाकडे गोळा करून चूल पेटवणे हाच खरा स्वावलंबी मार्ग असल्याचे सरकारने जणू नागरिकांना कृतीतून पटवून दिले आहे.

उज्ज्वला’ धुराड्यात, चुली पेटल्या अंगणात!

ज्या शहराने आधुनिकतेची कास धरली, तिथे आता गॅसअभावी पुन्हा ‘धूर’ दिसू लागला आहे. गॅस संपल्याने आणि “रिफिल’ मिळत नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना अक्षरशः चुली पेटवाव्या लागल्या आहेत. शहरातील सॉ-मिल (वखार) बाहेर जळाऊ लाकडे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करु लागले आहेत. अनेक छोट्या हॉटेल्सना गॅसअभावी टाळे लागले असून, रोजंदारीवर पोट भरणाऱ्यांचे हाल सुरु आहेत.

मुद्दे

  • गॅस बुकिंगचे फोन बंद असणे, हेव खरे ‘डिजिटल डिटॉक्स’!
  • गॅस पाइपलाइनच्या गप्पा मारता मारता आपण ‘लाकूड-फाटा’ युगात परतलो आहोत. हे कदाचित ‘रिव्हर्स रिव्होल्यूशन’ आहे.
  • उज्वला गॅसच्या टाक्या आता घरात शोभेच्या वस्तू म्हणून वापरून, अंगणात चुलीचा धूर काढणे हाच नवीन ‘इको-फ्रेंडली’ ट्रेंड !
  • प्रशासनाचा ‘साठा पुरेसा आहे’ हा दावा म्हणजे, पेशंट दगावल्यावर ‘औषधं उपलब्ध होती’ असे सांगण्यासारखं आहे.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...