नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
जेलरोड परिसरात (Jail Road Area) बुधवार (दि. १ जुलै) रोजी झालेल्या वीज अपघात प्रकरणी (Electrocution Incident) महावितरण कंपनीने गंभीर दखल घेतली असून, कनिष्ठ तंत्रज्ञांच्या निलंबनानतर नाशिक परिमंडळ आणि मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सदर नोटीस कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून ( Konkan Regional Office) बजावण्यात आली आहे. या दुर्दैवी अपघातात महावितरणच्या जय सकट या कनिष्ठ तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. यावेळी तंत्रज्ञ राजेश चौरे समवेत कार्यरत होते. काम करताना आवश्यक सुरक्षित साधनांचा वापर केला नाही तसेच सहकाऱ्याची काळजी घेतली नाही. या कारणांमुळे तंत्रज्ञ राजेश चौरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तसेच विद्युत सुरक्षेची जबाबदारी असणारे सदर दोन्ही कार्यकारी अभियंता (Executive Engineer) यांनी जनमित्रांचे सुरक्षा साधनांचा वापर करण्यासंदर्भात योग्य प्रकारे प्रबोधन केले नाही, अशी विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.




