Friday, September 4, 2026
HomeनाशिकNashik News : देशात पुरेसा साखरेचा साठा असताना दरवाढ आश्चर्यकारक - शेटे

Nashik News : देशात पुरेसा साखरेचा साठा असताना दरवाढ आश्चर्यकारक – शेटे

ओझे | विलास ढाकणे | OZE

- Advertisement -

देशात पुरेसा साखर साठा (Sugar Stocks) उपलब्ध असतानाही सध्या साखरेचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी केले.

नियोजनावर प्रश्नचिन्ह

भारतात (India) साखरेचे अत्यंत उत्तम नियोजन असते. वर्षभर पुरेल इतका आणि त्याहूनही अधिक बफर साठा देशात नेहमीच शिल्लक असतो. आजमितीला सर्वच सहकारी साखर कारखान्यांकडे मुबलक साखर उपलब्ध आहे. असे असतानाही साखरेचे दर अचानक भूतो न भविष्यती असे गगनाला भिडल्याने यामागे साठेबाजीचा प्रकार तर नाही ना, अशी शंका निर्माण होत असल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आणि कारखाने अडचणीत येण्याची भीती

साखरेच्या या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने जर आयातीचे धोरण स्वीकारले, तर देशात अतिरिक्त साखर दाखल होईल. परिणामी, बाजारातील साखरेचे भाव कोसळतील आणि साखर कारखान्यांसह शेतकरीही मोठ्या संकटात सापडतील, असा इशारा त्यांनी दिला.

शासकीय नियंत्रणावर शेटे यांचे बोट

केंद्र आणि राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही सहकारी साखर कारखाना साखरेचे एकही पोते कमी किंवा जास्त विकू शकत नाही. या संपूर्ण उद्योगावर शासनाचे पूर्ण नियंत्रण असताना साखरेचे भाव अचानक कसे वाढतात, हा नक्कीच संशयास्पद प्रकार आहे. इथेनॉल निर्मितीबाबत बोलताना त्यांनी सांगीतले की, जास्त उत्पादनाचा अंदाज असताना सरकार बी-ग्रेड आणि रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देते. तर उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्यास केवळ सी-ग्रेड मोलॅसेसपासून परवानगी दिली जाते. गरजेनुसार निर्यातबंदीसारखे निर्णय घेऊन वर्षभराचे नियोजन आधीच केलेले असते. त्यामुळे हे नियोजन अचानक कोसळणे शक्य नसून, ही दरवाढ पूर्णपणे शंकास्पद असल्याचे श्रीराम शेटे यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...