Wednesday, September 9, 2026
HomeनाशिकNashik News : लिफ्टमध्ये सव्वातास अडकले सहा ठेकेदार; जिल्हा परिषदेतील प्रकार

Nashik News : लिफ्टमध्ये सव्वातास अडकले सहा ठेकेदार; जिल्हा परिषदेतील प्रकार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकरोडवरील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) नूतन प्रशासकीय इमारतीत सोमवारी (दि. १३) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. पहिल्या मजल्यावरून वर जात असताना एक लिफ्ट अचानक तळमजला व पहिल्या मजल्याच्या (First Floor) दरम्यान अडकली. यामध्ये सहा ठेकेदार तब्बल सव्वातास अडकून पडले होते. लिफ्टमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने सुरुवातीला संपर्क साधणे कठीण झाले.

- Advertisement -

अखेर एका ठेकेदाराने बाहेर असलेल्या मित्राशी (Friend) संपर्क साधला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लिफ्ट देखभाल यंत्रणेला पाचारण करून सर्वांची सुरक्षित सुटका केली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले असून अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वीच या लिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या लिफ्टच्या दर्जाबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवीन प्रशासकीय हमारतीतील लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची माहिती मिळताच संबंधित देखभाल संस्थेला तातडीने कळविण्यात आले आहे. लिफ्टच्या देखभालीबाबत सविस्तर अहवाल मागविला असून, दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नाशिक

ताज्या बातम्या

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही...