नाशिक | Nashik
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेला नाशिक शहरात (Nashik City) मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील महिलांना अधिक सुविधा व्हावी, यासाठी नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने शहरात विविध भागात एकूण ३९ सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत मनपाकडे एकूण १ लाख, ९५ हजार, ५६२ अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त माहितीप्रमाणे यातील सुमारे ६ हजार अर्ज विविध कारणांनी रद्द करण्यात आल्याचे समजते.
ज्या वेळेस शासनाने योजना सुरु केली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी (Women) लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह (Collector Office) शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शहरातील महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून मनपाच्या माध्यमातून ११ जुलैपासून सुविधा ३९ सुविधा केंद्र सुरु केले आहे. प्रत्येक सुविधा केंद्रात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे.
राज्यातील महिलांसाठी शासनाने विशेष अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करुन त्याद्वारे महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहे. राज्यात अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची घोषणा केली होती. सुरूवातीला १ ते १५ जुलै २०२४ या काळातच अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर ३१ ऑगस्टपर्यंत व नंतर ३० सप्टेंबरपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
दरम्यान, आज अर्ज (Application) दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ११ जुलै ते २५ सप्टेंबरपर्यंत मनपाकडे एकूण १ लाख ९५ हजार ५६२ अर्ज प्राप्त झाले आहे. यातील १ लाख ८८ हजार ५८५ अर्ज मंजूर झाले असून ५ हजार ९१० अर्ज रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.
शासनाच्या सूचना
शासनाकडून योजना तळागळापर्यंत नेण्यासाठी विविध संस्थांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे. महिला व बालकल्याण विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्हिडिओ कॉफरन्सिंगद्वारेमनपाला सूचना केल्या होत्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा