Thursday, September 19, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील 'इतक्या' उमेदवारांना शासनाच्या 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार रोजगार

नाशिक जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार रोजगार

१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

नाशिक | Nashik

- Advertisement -

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) जवळपास २१७२ उमेदवारांना योजनादूत (Yojana Doot) होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सहा महिन्यांसाठी नियुक्त होणाऱ्या योजनादुताला दरमहा १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत पसरवणारे दोन संशयित ताब्यात; आडगाव गुन्हे पथकाची कामगिरी

राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क व महासंचालनालयामार्फत (Public Relations and Directorate General) मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात १३८३ ग्रामपंचायती आहेत. याशिवाय नाशिक, मालेगाव महानगरपालिका आहे. तसेच मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, सिन्नर नगरपरिषदेसह एकूण सहा नगरपंचायती आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास २१७२ योजनादूत नियुक्त होण्याची शक्यता आहे. नियुक्त झाल्यानंतर संबंधित योजनादूतांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

दरम्यान, या योजनेत (Yojana) सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वर्षे वयोगटातील पदवीधर, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, संगणक ज्ञान असावे. तसेच उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे देखील आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या