नाशिक | Nashik | प्रतिनिधी
देवळाली कॅम्पमधील (Deolali Camp) शिंगवे बहुला (Shinde Bahula) येथील लष्करी हद्दीत आज (गुरुवार) सकाळी १० वाजता लष्करी जवानांचे प्रात्यक्षिक सुरू असताना पॅराशूट कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगवे बहुला येथील भाऊसाहेब चव्हाण यांच्या घरावर (House) सकाळी १० वाजता लष्करी जवानांचे प्रात्यक्षिक सुरु असताना पॅराशूट (Parachute) जवानासह कोसळले. त्यात जवान किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, जखमी जवानास स्थानिक नागरिकांच्या आणि लष्करी जवानांच्या मदतीने मिलिटरी रुग्णालयात (Military Hospital) दाखल करण्यात आले आहे. तसेच भाऊसाहेब चव्हाण यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.




