Sunday, May 18, 2025
HomeनाशिकVideo : हल्ले करणार्‍यांना पोलिसी खाक्या दाखवा : गृहमंत्री अनिल देशमुख

Video : हल्ले करणार्‍यांना पोलिसी खाक्या दाखवा : गृहमंत्री अनिल देशमुख

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्यात १५६ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले असून या प्रकरणी ५५० हल्लेखोरांना अटक केली आहे. मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ले होत आहे. त्यांना प्रेमाच्या भाषेने समजून सांगा. तरी देखील समजले नाही तर पोलिसी खाक्या दाखवा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२९) मालेगाव व जिल्ह्यातील करोना परिस्थितिचा आढावा घेतल्यानंतर त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.

मालेगाव करोनाचे हाॅटस्पाॅट ठरत आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक देणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत पोलिसांवर हल्ले खपवून घेणार नाही. हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असे देशमुख यांनी सांगितले. परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. याबाबत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी बोलणार आहोत असे त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Operation Sindoor : “…तर तो न्याय होता”; भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत...

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kahsmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील...