Thursday, June 18, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : मानसिक तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या

Nashik Suicide News : मानसिक तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मानसिक तणावाखाली (Mental Stress) वावरणाऱ्या सतरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. ही घटना सरकारवाडा पोलिसांच्या (Sarkarwada Police) हद्दीतील शरणपूर गावठाण परिसरातील चर्चच्या मागे असलेल्या एका रुममध्ये गुरुवारी (दि. ११) सायंकाळी सहा वाजता घडली.

- Advertisement -

जयदीप किरण पाटील (वय १७, मूळ रा. मु. पो. आमडदे, ता. भडगाव, जि. जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीत शिक्षण (Education) घेत होता. विशेष म्हणजे त्याने इंग्रजीत सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात मानसिक तणावात असल्या संदर्भान त्रोटक वाक्य लिहिले आहे. जयदीप हा आमडदे गावातील मित्रासह शरणपूर गावठाणातील एका रुममध्ये भाडेतत्त्वावर वास्तव्यास होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. दरम्यान, शनिवारी आणि आणि रविवारी सुट्टी असल्याने त्याच्या रुममेट मित्राने (Friend) त्याला गावी जाऊ असे म्हटले होते. मात्र त्याने नकार देऊन ‘तुच जा’ असे सांगितले. त्याचा मित्र गुरुवारी सकाळी गावी निघाला असता, सायंकाळी सहा वाजता जयदीपने गळफास घेतल्याची घटना उघड झाली. त्याला नातलगांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी सुसाईड नोटच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

संशयास्पद उल्लेख

जयदीप याने आत्महत्येपूर्वी इंग्रजीतील लिहिलेल्या मजकुराची चिठ्ठी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतली आहे. त्यात ‘माझ्यामुळे कुणाला त्रास नको’, आई, वडील, भाऊ सुखी रहा, मला काही अडचण नसून वैयक्तिक कारण आहे. तसेच चिठ्ठडीत जादूटोणासंबधी काही संशयास्पद उल्लेख आढळून आला आहे. त्यामुळे मानसिक तणावासह भीतीतून त्याने गळफास घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...