खडक माळेगाव | वार्ताहर | Khadak Malegaon
येथील रायते वस्ती जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना (Student) शाळेत (School) जाणारा नदीतील (River) रस्ता पुराच्या पाण्याने पूर्ण खचला आहे. त्यामुळे आपला शालेय अभ्यास मागे राहू नये म्हणून शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्यांना आपल्या शिक्षणासाठी गुडघाभर पाण्यातून मानवी साखळीचा आधार घेऊन वाट काढावी लागत आहे.
हे देखील वाचा : “आदिवासी असल्यामुळेच माझ्यावर…”; ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतचा सरकारवर गंभीर आरोप
नदीपात्रातील खचलेल्या पुलावरील (Brige) पाण्यात विद्यार्थ्यांचे पालक स्वत: उभे राहून विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवतात. भर पावसात जर नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर मोठा धोका या शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यासमोर उभा राहू शकतो. यामुळे पालक व विद्यार्थी सद्या त्रस्त झाले आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : युवती आत्महत्याप्रकरणी संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
हाकेच्या अंतरावरील शाळेत जाणारा हा पूल अडचणीचा झाल्याने भर पावसात (Rain) शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी (Education) दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घेऊन शाळेत जाण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्याच्या शिक्षणात मोठा अडसर निर्माण झाला असून पालक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा : Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
दरम्यान, हा शैक्षणिक अडसर दूर होण्यासाठी पालक ग्रामस्थ व ग्रामपालिका यांच्याकडून गत काही वर्षांपासून सातत्याने या नदी पात्रातील भक्कम पुलाची मागणी होत आहे.मात्र,अद्याप आश्वासनापलीकडे कोणताच निर्णय घेतला जात नाही. या प्रलंबित मागणीचा विचार न झाल्यास पालक वर्ग आपल्या चिमुकल्यांसह उपोषणास बसतील अशी संतप्त प्रतिक्रिया काही पालकांनी दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा