इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
काल सायंकाळच्या सुमारास शहरातील पाथर्डी परिसरातील (Pathardi Area) नांदूर रस्त्यावरील वालदेवी नदीवर (Valdevi River) गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकाचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता शहरातील इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) सराफ लॉन्स भागात पत्नी-पत्नीने त्यांच्या ९ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हे देखील वाचा : नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; वालदेवी नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय माणिकराव सहाणे (४०) ज्ञानेश्वरी विजय सहाने (३६) व अनन्या विजय सहाणे अशी आत्महत्या (Suicide) केलेल्या तिघांची नावे आहेत.विजय हे एका कंपनीमध्ये कामगार होते. तसेच मागील काही दिवसांपासून त्यांची कंपनी बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास आपली नातं शाळेत जाण्यासाठी अजून खाली आली नाही म्हणून माणिक सहाणे त्यांना बघण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र, दरवाजा आतून बंद होता.त्यांनी बराच वेळ दार ठोकून बघितले. काहीही उत्तर मिळत नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली आणि त्यांनी मदतीसाठी समोरच राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना बोलावले.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “त्यांच्या जिभेला चटके…”; आमदार संजय गायकवाडांनंतर भाजप खासदाराचे राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
त्यानंतर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता त्यावेळी विजय, ज्ञानेश्वरी आणि अनन्या मृतावस्थेत आढळून आले. यानंतर इंदिरानगर पोलिसांना (Indiranagar Police) घटनेची माहिती देण्यात आली. तसेच या तिघांजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसून तिघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा