Thursday, October 22, 2026
HomeनाशिकNashik News : सातपीर दर्गाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Nashik News : सातपीर दर्गाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या वतीने शहरातील द्वारका भागातील (Dwarka Area) हजरत सातपीर बाबा दर्गा अतिक्रमणावर झालेली कारवाई बेकायदेशीर आहे. दर्ग्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा करत मनपा विरुध्द सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली होती. मनपाने १६ एप्रिल रोजी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा कारवाई करुन अतिक्रमण काढले, तर त्याच दिवशी दुपारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती आदेश दिले, मात्र तोपर्यंत कारवाई झालेली होती. आता आज त्याची सुनावणी होत असून त्याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मनपाला दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नव्हती, तसे कोणतेही पत्र देखील प्राप्त झालेले नव्हते. असा दावा मनपाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला स्थगिती आदेश मनपाला (NMC) १७ एप्रिलला दुपारी मिळाला आहे. उद्या मनपा आपली बाजू मांडणार असल्याची माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

दरम्यान, द्वारका परिसरातील सातपीर बाबा दर्गा येथे मंगळवारी रात्री अतिक्रमणावरून (Encroachment) झालेल्या वादावरून तुफान राडा झाला होता. पोलिसांनी त्याबाबत कारवाई सुरू केली असून या संपूर्ण परिसरातील रस्ते बंद होते तर जवळपास खुले करण्यात आले आहे. बॅरेकेटिंग बाजूला करुन मार्ग सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तणावपूर्ण शांतता कायम आहे. परिसरात पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 7000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची (Soybean) 25 क्विंटलची आवक होवून किमान 6700...