Friday, October 18, 2024
HomeनाशिकNashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे...

Nashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन

नाशिक | Nashik

त्र्यंबकरोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Seven Hospital) प्रसूत झालेल्या नवमातांच्या डिस्चार्जवेळी मंगळवारी (दि.१५) रात्री थेट नवजात बाळांची (New Borns Babies) आदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर नातेवाईकांनी बाळ घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडत या प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आरोग्य विभागाने ( Department of Health) मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मुलगा झाल्याचे सांगितले अन् सोपवली मुलगी

बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टर आणि एका परिचारिकेचे (Seven Doctors and One Nurse) आरोग्य विभागाने तडकाफडकी निलंबन केले आहे. काल घडलेल्या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यानंतर अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा (Action) बडगा उगारला आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar On Jayant Patil : विधानसभेसाठी जागांचा निर्णय…; शरद पवारांच जयंत पाटलांबाबत मोठं विधान, तर जयंत पाटील म्हणाले,

नेमकं काय घडलं होतं?

नांदूरनाका परिसरातील रूतिका महेश पवार ही महिला प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेने रविवार (दि.१३) रात्री ११.३० च्या सुमारास बाळाला जन्म दिला. बाळ पुरुष जातीचे असल्याचे परिचारिकांनी नातेवाईकांना सांगितले. प्रसूती कक्षातील रजिस्टरवर तशी नोंदही करण्यात आली. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला एसएनसीयू कक्षात हलवून उपचार सुरू करण्यात आले. बाळाच्या पोटात पाणी असल्याने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नातलगाची हत्या करणारे दोषी; दोन कुटुंबातील सात जणांना जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

मंगळवारी रात्री नातलगांनी डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली. एसएनसीयूमध्ये बाळाचे डायपर बदलताना हातात असलेले बाळ मुलगा नव्हे तर मुलगी असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. आम्हाला मुलगा झाला असताना मुलगी कशी देता? असा सवाल करीत त्यांनी उपस्थित परिचारिकांना जाब विचारला. परंतु हे तुमचेच बाळ आहे असे परिचारिका सांगू लागल्या. नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील नोंदी तपासण्याची मागणी केली. रुतिका पवार यांच्या नावापुढे मुलगा झाल्याची नोंद होती. काहीतरी चुकीचे घडत आहे असे निदर्शनास आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या