Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमNashik News : पंचवटी परिसरात बापलेकाचा संशयास्पद मृत्यू

Nashik News : पंचवटी परिसरात बापलेकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील द्वारका चौकातील (Dwarka Chowk) उड्डाणपुलावर धुळ्याकडून मुंबईकडे (Mumbai) लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टेम्पोने (छोटा हत्ती) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघातात होऊन
पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१२) रोजी रात्री साडे सातच्या सुमारास घडली होती. हे सर्व मृत नाशिकमधील सिडको परिसरातील रहिवासी होते. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

अशातच आता ही घटना ताजी असतानाच पंचवटी परिसरातील काळाराम मंदिरालगत असलेल्या रामराज्य संकुलात राहणाऱ्या बापलेकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत आत्माराम गुरव (वय ४९) व अभिषेक प्रशांत गुरव (वय २८) अशी मृत बापलेकांची नावे आहे.

दरम्यान, सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे अॅसिड प्रशांत यांनी सेवन करुन आत्महत्या केली. यानंतर ज्या ग्लासने ॲसिड सेवन केले, त्याच ग्लासात मुलाने पाणी प्यायले. त्यातून दोघांचा मृत्यू झाल्याची पंचवटी पोलिसांची माहिती. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...