नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वरातील ज्योतिर्लिंगाच्या (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या देशभरातील भाविकांना (Devotees) दर्शनरांगेसह मंदिराबाहेर पिसाळलेल्या कुत्र्याने (Dog) चावा घेतला. या घटनेत दहाहून अधिक मुले मुली जखमी झाली आहे. या मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, इंजेक्शन देण्यात आले आहे. आणखी भाविकांची संख्या वाढणार आहे.
दक्ष सुनील राठोड (वय ७, रा. भोपाळ, मध्यप्रदेश), अक्षदा रवींद्र कोरडे (२०, हिरवाडी, नाशिक), चैतन्य अमोल भालेकर (१२, अंधेरी), तेजस राजकुमार तिवारी (४, रा. कानपूर, उत्तरप्रदेश), मनुष महेश सायला (८, तेलंगणा), साई सतीश गर्जे (६, रा. जळगाव), नेहा प्रकाश गायकवाड (१७, रा.त्र्यंबक), स्वरा उमेश भालसिंग (२.५, रा. वाळकी, जि. आहिल्यानगर) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान एक पिसाळलेला कुत्रा आले. काही समजण्याच्या आतच या कुत्र्यांने दर्शनरांगेसह मंदिर परिसर व बाहेरील भाविकांना चावा घेण्यास सुरुवात केली. यामुळे भाविक भयभीत झाले होते. या कुत्र्याने अनेक चिमुकल्यांना चावा घेतला.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखत कुटुंबियांनी मुलांना त्र्यंबकेश्वर रुग्णालयात (Trimbakeshwar Hospital) दाखल केले. या ठिकाणी मुलांवर उपचार करण्यात आले. त्यांना श्वान दंशाचे इंजेक्शन देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा सणालयात (District Hospital) दाखल करण्यात आले.