Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : पावणेदोनशे कोटींच्या सफाई ठेक्यासाठी निविदा

Nashik News : पावणेदोनशे कोटींच्या सफाई ठेक्यासाठी निविदा

यंदा अटीशर्तीत बदल, ठेका पाच वर्षांसाठी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या व मागील काही काळात तब्बल सुमारे पाच वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या नाशिक शहरातील (Nashik City) साफसफाईच्या १७६ कोटी रुपयांच्या ठेक्यासाठी (Tender) मनपाने नुकतीच निविदा प्रसिध्द केली आहे. २० जानेवारीपर्यंत इच्छुकांना त्यात भाग घेता येणार आहे. यानंतर मनपा आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन अंतिम निर्णय घेणार आहे. ठेक्यासाठी काही प्रमाणात अटी-शर्तीत बदल करण्यात आले तर यंदाचा ठेका तीन ऐवजी थेट पाच चर्षासाठी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

नव्या अटी शर्तीत (Conditions ) १०० कोटींचा नेटवर्थचा मुद्दा असल्याने मोठ्याच मक्तेदार त्यात भाग घेऊ शकणार आहे. १७६ कोटी रुपये खर्चुन शहरातील रस्ते, महापालिकेच्या शाळा व मिळकतींच्या स्वच्छतेसाठी पाच वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. याअंतर्गत ८७५ सेवकांची कंत्राटी पध्दती नियुक्ती होणार आहे. तर त्यात दहा टक्के राखीव सेवक धरुन यंदा सुमारे १ हजार सेवकांसाठी ठेक्यात मुद्दल असल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी या ठेक्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र विशिष्ट ठेकेदारासाठी निविदेत अटी शर्तीचा समावेश करण्यात आल्याचा आरोप झाल्याने व त्या विरोधात भाजप आमदारांनी BJP MLA) तक्रारी केल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्या प्रक्रियेला थांबवले होते. तर नवीन आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांच्यापुढे घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेक्याबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...