Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik Shivsena UBT News : गोदावरीच्या पाण्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; कारण...

Nashik Shivsena UBT News : गोदावरीच्या पाण्यात उतरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोदावरी नदीपात्रात (Godavari River) ड्रेनेज तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोडून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सोमवारी रामकुंड येथे गोदावरीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत भाविक (Devottes) श्रद्धेने स्नानासाठी येतात. मात्र नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गोदावरीत सांडपाणी सोडणे बंद करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, या आंदोलनात (Protest) शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...