Saturday, July 25, 2026
Homeक्राईमNashik Trimbakeshwar Darshan Scam : पुरुषोत्तम कडलगसह पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : पुरुषोत्तम कडलगसह पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पैसेवाल्यांसाठी देवाचे दार झटपट उघडून देणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple) हायप्रोफाईल पेड दर्शन घोटाळ्यातील संशयितांना (Suspected) आता थेट न्यायालयाच्या (Court) उन्हाळी सुटीचा फटका बसला आहे. मुख्य संशयित पुरुषोत्तम कडलग याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी (दि. ३०) उन्हाळी सुटीमुळे टळली असून, ती आता थेट ८ जून रोजी होणार आहे. परिणामी, या महाभागांचा नाशिकरोड कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.

- Advertisement -

सामान्य भाविक तासन्तास उन्हात रांगेत उभे असताना, दुसरीकडे अडीच ते तब्बल १२ हजार रुपये उकळून भाविकांना (Devottes) मागच्या दाराने थेट दर्शन देणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या तपासात या टोळीने देशभरातील श्रीमंत भाविकांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संशयित पुरुषोत्तम कडलग, गोटीराम पेहरे, ओम कडलग, वसंत मुर्तडक यांच्यासह पाच जण सध्या गजाआड आहेत.

दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने आधीच संशयितांचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे पुरुषोत्तमने सत्र न्यायालयात (Seassion Court) धाव घेतली, मात्र तेथेही सुनावणी लांबणीवर पडली. देवाच्या दारी सर्व समान असतात, हा नियम पायदळी तुडवणाऱ्या दलालांना आता उन्हाळी सुटीमुळे तुरुंगातच (Jail) प्रायश्चित्त भोगावे लागत आहे, अशी चर्चा भाविकांमध्ये आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...