Friday, May 29, 2026
HomeनाशिकNashik News : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

Nashik News : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी शिक्षण विभागाचा निर्णय

नाशिक | विजय गिते | Nashik

- Advertisement -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये (Local Body School) शिक्षण (Education) घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत दप्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार ६७८ विद्यार्थी-विद्यार्थिनींना याचा लाभ होणार असून, राज्यातील एकूण ४१ लाख ४३ हजार ५४ विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. यासाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची (Student) शंभर टक्के उपस्थिती वाढविण्यासाठी आणि शालेय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच मध्यान्ह भोजन योजना लागू करण्यात आली आहे. सध्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला. प्राथमिक शिक्षण संचालकांनी सादर केलेला १६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

सध्या पुणे आणि मुंबई (Pune Mumbai) येथील महापालिकांकडून विद्यार्थ्यांना दप्तर किंवा त्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, आता राज्यस्तरावर थेट मोफत दप्तर देण्यात येणार आहे. ज्या महापालिका स्वतःच्या निधीतून ही योजना राबवितात, त्या शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य योजनेतून वगळण्यात येणार आहे. १६५ कोटी रुपयांच्या निधीच्या मर्यादेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर पुरविण्यास शासनाने मंजुरी दिल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अडचणी टाळण्याची मागणी

ज्या महानगरपालिका (उदा. मुंबई, पुणे) स्वतःच्या निधीतून आधीच मोफत दप्तर देतात, त्यांच्या शाळांतील विद्यार्थी या राज्य योजनेतून वगळले जानार आहे. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ही योजना राबवली जाईल. दप्तरांचा दर्जा चांगला राहावा आणि वेळेत वितरण व्हावे, यासाठी विभागाकडून काळजी घेतली जाणार आहे. पालक आणि शिक्षकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, पूर्वीच्या मोफत योजनांप्रमाणे (पाठ्यपुस्तके, गणवेश) अंमलबजावणीतील अडचणी टाळण्याची मागणी केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी संख्या

बागलाण – १७,७५८
चांदवड – १३,९९१
देवळा – ७,१७८
दिंडोरी – २३,३८६
इगतपुरी – १९,७६५
कळवण – १२,३२५
मालेगाव – २७,७५६
नांदगाव – १८,७२५
नाशिक – १२,५३५
निफाड – २१,३९२
पेठ – ११,६३४
सिन्नर – १६,६७७
सुरगाणा – १४,७६३
त्र्यंबकेश्वर – १४,७३३
येवला – १४,५०८
पीएम श्री शाळा – ७,४५२

एकूण – २,५३,६७८ विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...