Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : 'समृद्धी'वरील अखेरच्या टप्याचे उद्या लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती

Nashik News : ‘समृद्धी’वरील अखेरच्या टप्याचे उद्या लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती

विनाअडथळा वेगवान प्रवास

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

अखेर नागपूर-मुंबई (Nagpur to Mumbai) समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) इगतपुरी ते आमणेपर्यंतच्या (Igatpuri To Aamane) शेवटच्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. कित्येक दिवसांपासून महामार्गाचा हा टप्पा उ‌द्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. उद्या गुरुवारी (दि.५) नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी येथील सोहळ्यात केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा ७६ कि.मी. लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसाराघाट अवघ्या ८ मिनिटांत पार करता येणार आहे.

YouTube video player

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी एमएसआरडीसीने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करण्यात आला होता. शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. यापूर्वी १ मेस, महाराष्ट्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. त्यादृष्टीने एमएसआरडीसीने (MSRDC) हालचालीही सुरू केल्या होत्या. मात्र, त्यावेळी मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे लोकार्पणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

दृष्टीक्षेपात महामार्ग

– इगतपुरी ते आमणे ७६ कि.मी.चा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा
– ३५ मीटर रूंद आणि ६ लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग असणार आहे.
– मुंबईकरांना फक्त ८ तासांत नागपूर गाठता येणार आहे.
-नाशिक येथून मुंबई अडीच तासांत गाठणे शक्य.
– समृद्धी महामार्ग हा ६ लेनचा, १२० मीटर रुंदीचा आणि ७०१ किलोमीटर लांब महामार्ग
– ताशी १५० कि. मी. गतीने प्रवासासाठी महामार्गाचे डिझाइन.
– महामार्गावर ६५ उड्डाणपूल, २४ इंटरचेंज, कसारा घाटातून जाताना ६ बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास.
– इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ ८ कि.मी. लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे. अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फूल वॉटर मिस्ट सिस्टिमने सुरु आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Ajit Pawar Death : थोड्याच वेळात अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...