Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : एचएएलच्या 'तेजस'चे हवाई दलाला बळ; पहिले विमान जूनअखेर दाखल...

Nashik News : एचएएलच्या ‘तेजस’चे हवाई दलाला बळ; पहिले विमान जूनअखेर दाखल होणार

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

भारताच्या स्वदेशी लढाऊ क्षमतेत भर टाकणाऱ्या ‘तेजस एमके-१ ए’ (Tejas MK 1A) लढाऊ विमानाची पहिली डिलिव्हरी येत्या जून २०२५ अखेर नाशिकमधील (Nashik) हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या उत्पादन केंद्रातून भारतीय हवाई दलाकडे (आयएएफ) करण्यात येणार आहे. हा क्षण केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ‘मेक इन इंडिया’च्या संरक्षण क्षेत्रातील एक अभिमानास्पद टप्पा ठरणार आहे.

- Advertisement -

‘तेजस एमके-१ ए’ चे उत्पादन व वितरण हे भारताच्या (India) लढाऊ क्षमतेत एक क्रांतिकारी वळण आहे. या ऐतिहासिक प्रक्रियेचे नाशिक हे शहर साक्षीदार ठरणार असून, येत्या काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचे हे यश देशाच्या सुरक्षेला नवी उंची प्रदान करेल. त्यासोबतच नाशिकच्या लौकिकात भर घालणार आहे.

स्वदेशी निर्मितीकडे आत्मनिर्भरतेचे मोठे पाऊल सध्या नाशिकमध्ये ‘तेजस एमके-१ ए’ चे पहिले विमान (Air Craft) अंतिम उत्पादनाच्या टप्प्यात आहे. डिलिव्हरीनंतर त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलात (Indian Air Force) प्रत्यक्ष चाचण्या घेतल्या जातील. चाचण्या यशस्वी झाल्यास भारताचे स्वदेशी लढाऊ विमान निर्मितीकडे आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल. यात नाशिकचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

उत्पादन विस्ताराचे केंद्र नाशिक

एचएएलने नाशिकच्या मिग कॉम्प्लेक्समध्ये ‘तेजस एमके-१ ए’ चे उत्पादन सुरू करत तिसरी उत्पादन लाइन कार्यान्वित केली आहे. याआधी बंगळुरूमध्ये (Bangalore) दोन उत्पादन लाइन कार्यरत आहेत. सुरुवातीला दरवर्षी ५ विमाने बनवण्याची क्षमता असून ती ८ पर्यंत वाढवण्याचा मानस आहे. भारतभरातील एचएएलच्या तीनही उत्पादन केंद्रांद्वारे एकत्रित दरवर्षी २४ लढाऊ विमाने तयार करता येऊ शकतात.

‘तेजस एमके- १ ए’ आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक

मिग-२१ सारख्या जुन्या लढाऊ विमानांच्या जागी ‘तेजस एमके-१ ए’ भारतीय हवाई दलात समाविष्ट होणार आहे. या प्रगत विमानामध्ये ईएल/एम-२०५२ एईएसए रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, आणि स्वदेशी डेटा लिंक यांसारखी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. हे लढाऊ विमान सुमारे ६५ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, भारताच्या संरक्षण स्वावलंबनाचा तो एक ठळक प्रतीक आहे.

घटक पुरवठा आणि विलंबाचे आव्हान

मेम २०२५ मध्ये व्हिइएम टेक्नॉलॉजीज या भागीदार कंपनीने पहिला सेंटर फ्यूजलेज एचएएलला सुपूर्द केला. मात्र, जीई एव्हिएशन (अमेरिका) कडून इंजिन पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचे वेळापत्रक एक वर्षाहून अधिक मागे पडले. त्यामुळे हवाई दलाच्या वाढत्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी उत्पादनाचा वेग वाढवणे हे आता एचएएलसमोरचे एक महत्त्वाचे आव्हान आहे.

स्थानिक आणि राष्ट्रीय अभिमानाचा क्षण

नाशिकमधून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार, तांत्रिक कौशल्य विकास आणि जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नाशिकचा ठसा अधिक गडद होईल. तेजस एमके-१ ए हे केवळ एक लढाऊ विमान नसून, ‘मेक इन इंडिया’ च्या यशाचे उड्डाण आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...