ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये आई-वडिलांच्या (Parents) निधनानंतर गंभीर जखमी झालेली मुलगी समृद्धीचेही उपचारानंतर निधन (Passed Away) झाले आहे. सोमवारी (दि.२४) रोजी रात्री झालेल्या अपघातात (Accident) जखमी समृद्धीवर नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. समृद्धी तब्बल पाच दिवस मृत्यूशी झुंज देत होती, ती बरी व्हावी यासाठी सर्वच स्तरातून प्रार्थना सुरू होती. मात्र, आई-वडिलांच्या निधनाच्या अवघ्या पाच दिवसांतच समृद्धीने पण अखेरचा श्वास घेतल्याने संपूर्ण बर्डे परिवारासह नातेवाईक व ग्रामस्थ शोक सागरात बुडाल्याचे दिसून आले.
दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा (Walkhed Phata) येथील वजन काट्यासमोर कार क्रमांक (एमएच ०१ डीवाय ०६९१) व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांक (एमएच ०५ एफ.जे ८१८८) यांच्यात भीषण अपघात झाला होता. करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (४३), पत्नी सुरेखा सतीश बर्डे (४०) व मुलगी समृध्दी सतीश बर्डे (१७) हे तिघे कारव्दारे निळवंडी येथून नातेवाईकांकडून आपल्या करंजवण गावी परतत असतांना सोमवारी (दि.२४) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी (Dindori) वजन काट्याजवळ समोरुन येणाऱ्या आयशरशी धडक झाली.
दरम्यान, या धडकेत तिघेही गंभीर जखमी (Injured) झाले होते. यानंतर त्यांना नाशिक (Nashik) येथील खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी दाखल केले असता पती-पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. मात्र, आज समृद्धीच्या जाण्याने तालुक्यात (Taluka) हळहळ व्यक्त होत आहे. तिच्यावर करंजवण (Karanjavan) येथे शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
करंजवण गावावर शोककळा
आई-वडिलांच्या निधनानंतर मुलगी समृद्धीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असलेल्या गावात तिच्या निधनाची बातमी पसरताच करंजवण ग्रामस्थांनी (Villagers) स्वयंस्फुर्तीने बंद पाळला.