नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांना समर्पित महारांगोळी गोदाकाठी (Goda River) साकारण्यात आली आहे. हिंदू नववर्षा स्वागत महोत्सवानिमित्त गोदाकाठी वीस हजार स्केअर फुटांची महारांगोळी (Rangoli) शंभर महिलांच्या योगदानातून साकारलेली आहे.
या महारांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यातून त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्व नेतृत्व व दातृत्व त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अधोरेखित केले आहे. हिंदू समाजाच्या (Hindu Society) एकत्वासाठी अस्मितेसाठी अनेक मठ, मंदिरे, पाट, धर्मशाळा, विहिरी त्यांनी भारतातील ४१ वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दोन हजार बांधकामे केली.
त्यातून प्रजा हितरक्षण झाले. त्याचे चित्रीकरण या रांगोळीतून केले आहे. सुराज्य व प्रजाहीत रक्षणसाठी केलेले कृषीविषयी व आर्थिक नियोजन यांचेही चित्रीकरण या महारांगोळीत आले आहे. या रांगोळीचा प्रथम ठिपका ठेवण्यासाठी नानासाहेब होळकर (Nanasaheb Holkar) हे अहिल्यादेवींचे आठवे वंशज उपस्थित होते.
त्याचबरोबर याप्रसंगी महिला कीर्तनकार प्रेरणा बेळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सर्वांसमोर मांडले. याप्रसंगी अध्यक्ष शिवाजीराव बोदार्डे, चंद्रशेखर जोशी, राजेश दरगोडे, आरती गरुड, सुजाता कापूरे, नीलेश देशपांडे उपस्थित होते. तर आभार मयुरी शुक्ल यांनी मानले.