ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) शिंदवड (Sindwad) येथे (दि.२८ मार्च) रोजी जखमी बिबट्या असल्याचे ग्रामस्थांनी वनविभागाला (Forest Department) कळवले होते. वनविभागाकडुन तात्काळ येवून बिबट्या (Leopard) असलेल्या ठिकाणी पाहणी करत असतांना बिबट्याने वन कर्मचारी यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. या हल्ल्यात शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर हे दोघे जखमी झाले होते.
शिरसाठ यांच्या पाठीवर बिबट्याने झेप घेत चावा घेतला होता, त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु असुन टेमकर यांच्या पायाला बिबट्याने पंजा मारुन दुखापत केली आहे. त्यानंतर पाचारण केलेली रेस्कीव टीम दाखल झाली व बिबट्याला बेशुध्द करत बिबट्या जेरबंद केला व जखमी बिबट्यावर उपचार सुरु केले. यानंतर बिबट्याला नाशिक येथे वनविभागाकडून आवश्यक उपचार देण्यात आले, परंतु बिबट्याच्या तब्बेतीत कुठलीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर काल बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे वनविभाकडून सांगण्यात आले. परंतु, बिबट्या पकडतांना झालेला हल्ला यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बिबट्यांची वाढती संख्या यावर शासनाकडून कुठलीही उपायोजना दिसुन येत नाही. बिबट्यांचा वावर शेती पिकांमध्येच दिसून येतो, मानवाचा व बिबट्याचा रोजचा संघर्ष, भटके व पाळीव कुत्रे यांना पाणी शेताजवळच (Farm) मिळत असल्याने बिबट्याचा मुक्काम शेती पिकातच असतो. वन्यजमिनींवर जंगल नसल्याने बिबट्याला लपण्याठी जागा नाही. वाढती बिबट संख्या परंतु तालुका स्तरावर अतिरिक्त रेस्क्यू टीम नाही. रोज लोकांमध्ये बिबट्याबाबतची माहिती देण्यासाठी वनमित्र नाही, ज्यादा कर्मचारी वर्ग नाही. याबाबत शासन किती लोकांवर बिबट्यांच्या हल्ल्याची वाट बघत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात नुकसानभरपाई देण्यापेक्षा शेतकऱ्यांना (Farmer) वाचवा व वनविभागाला कर्मचारी वाढवा आणि आधुनिक उपायोजना करुन सक्षम बनवा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामस्थांनी उपस्थित केले काही प्रश्न
बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडे संरक्षण जाळी व नॉयलान जाळी सोडन काहीच नाही.
प्रत्येक तालुका स्तरावर रेस्क्यू टीम कार्यरत नाही.
बिबट्यांची वाढती संख्या, मात्र वनविभागाकडे ज्यादा कर्मचारी किंवा तातडीची उपाययोजना नाही.
बिबट्याची वाढती संख्या लक्षात घेता यावर काही उपाय नाही.
बिबट्या पकडतांना हल्ला झाला तरी वन कर्मचारी किंवा इतरांना तातडीने उपचार मिळण्यासाठी वाहन नाही.