Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात; ओळखपत्राशिवाय कुणालाही...

Nashik News : मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात; ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले असून, बैठकीला त्वरित सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात ही बैठक सुरु असून, परिसरात तीन लेयरची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. तसेच ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नसून, बैठकीस पत्रकारांना देखील परवानगी नाकारण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ११ वाजेच्या सुमारास नाशिकमधील ओझर विमानतळावर (Ozar Airport) आगमन झाले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने थेट बैठकीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यानंतर त्यांनी तात्काळ बैठकीला सुरुवात केली.

आमदार धस फडणवीसांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 

भाजपचे बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. पंरतु, मुख्यमंत्री फडणवीस त्यांना भेटतात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

बैठकीला तीन मंत्री व १३ आखाड्यांचे महंत उपस्थित

सिंहस्थ कुंभमेळा बैठकीला तीन मंत्री मंत्री गिरीश महाजन,शिक्षणमंत्री दादा भूसे व अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित आहेत. तसेच नाशिकचे तीन व त्र्यंबकेश्वरच्या १० आखाड्यांचे महंत या बैठकीला हजर आहेत.

सुरक्षिततेसाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...