Sunday, October 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशकात पावसाची विश्रांती; दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन

Nashik News : नाशकात पावसाची विश्रांती; दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दमदार हजेरी लावल्यानंतर गुरूवार (दि.१०) पासून पावसाने (Rain) विश्रांती घेतल्याने धरण परिसरातील (Dam Area) पाण्याची पातळी स्थिर झाली आहे. त्यामुळे धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग बहुतांश बंद झाल्याचे चित्र आहे. तर शहर परिसरामध्ये सूर्यदर्शन दुर्लभ झाले होते. सततच्या ढगाळ वातावरणात गुरुवारपासून बदल होऊन आता कडक ऊन पडत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूरसह (Gangapur) विविध धरणांच्या पाणीपातळीमध्ये स्थिरता आली आहे. परिणामी धरणातून विसर्ग कमी झाला आहे.किंबहुना अनेक धरणांमध्ये विसर्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी (Godavari) घाटावरील जनजीवन पूर्ववत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यापासून मान्सूनचे आगमन होत असते, यावेळी वेळेत मान्सूनचे आगमन झाले असले तरी मागील पंधरा ते वीस दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.

दुसरीकडे पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांना (Farmer) दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे धरणातून ३ लाख ४१ हजार १४७ क्युसेस पाण्याचा (Water) विसर्ग झाला असून, २ लाख ९४ हजार ८५ दलघफू पाणी जायकवाडी धरणाकडे रवाना झाले आहे. जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत खरीपाच्या अवघ्या ४७ टक्के पेरण्याच पूर्ण होऊ शकल्या होत्या. मात्र अनेक भागांमध्ये शेतात (Farm) मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे थंडावली होती. आता पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेताच्या मशागतीला व खरीपांच्या पेरण्यांना वेग येणार आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : जिद्द अन् संघर्षाचा कोल्हापूर पॅटर्न!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक आज राजकारणात बर्‍याचदा तडजोड हीच सोपी वाट समजली जात असली तरी संघर्ष हाच अंतिम सत्याचा मार्ग...